SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:39 IST2026-04-07T15:38:32+5:302026-04-07T15:39:00+5:30
West Bengal Assembly Election 2026: भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील एसआयआरमध्ये विचाराधीन असलेल्या ६० लाखांहून अधिक मतदारांबाबत सविस्त माहिती प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत एकूण ९०.६६ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहे.

SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
भारतीय निवडणूक आयोगानेपश्चिम बंगालमधील एसआयआरमध्ये विचाराधीन असलेल्या ६० लाखांहून अधिक मतदारांबाबत सविस्त माहिती प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत एकूण ९०.६६ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच जिल्हानिहाय पद्धतीने नावं जोडण्याची आणि हटवण्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाची प्रक्रिया तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण झाली आहे. २०२५ साली डिसेंबर महिन्यात मतदार याद्यांचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला तेव्हा ५८.२ लाख लोकांची नावं हटवण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अंतिम यादी प्रकाशित होईपर्यंत आणखी ५.४६ लाख नावं हटवण्यात आली होती. तसेच विद्यमान न्यायालयीन हस्तक्षेप आणि विस्तृत तपासणीनंतर २७ लाखांहून अधिक नावं हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदार यादीतून हटवण्यात आलेल्या लोकांची संख्या ९० लाखांपर्यंत पोहोचली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. त्यात २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.