शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

West bengal Assembly Election : "मी मोठा भाऊ आहे, हात उचलला म्हणजे ती थप्पड म्हणता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 9:42 PM

West bengal Assembly Election 2021: भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल (West bengal Assembly Election 2021) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, यावर बाबुल सुप्रियो यांनी सष्टीकरण दिले आहे. कोणालाही थोबाडीत मारली नाही. एका व्यक्तीला फक्त मोठा भाऊ म्हणून धक्का दिला होता. कारण, त्याठिकाणी महिला देखील बसल्या होत्या आणि तो दारू पिऊन उद्धटपणे वागत होता, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे. (West bengal Assembly Election 2021: babul supriyo clarification on slapping video)

"काल (रविवारी) काहीही झाले नाही. जे काही आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. महिला मोर्चाच्या काही महिला त्याठिकाणी बसल्या होत्या आणि काही लोक दारू पिऊन होते. त्या लोकांनी महिलांशी गैरवर्तन केले. त्यामुळे त्यांना धक्का दिला", असे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले. तसेच, या घटनेवरून टीका करणाऱ्या टीएमसीलाही प्रत्युत्तर दिले."मला काय करावे लागेल ते मला टीएमसीकडून शिकण्याची गरज नाही. मी एक मोठा भाऊ आहे आणि जर काही तणाव असेल तर भाऊ म्हणून मी हात उचलला तर ती थप्पड होणार नाही", असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

दरम्यान, टॉलीगंज येथे रविवारी (28 मार्च) दुपारी 12 वाजता होळी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची देखील तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो 12 वाजता येणार होते. मात्र त्यांना काही कारणांमुळे कार्यक्रम स्थळी येण्यासाठी दुपारचे अडीच वाजले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागतही केले. यावेळी तेथे माध्यम प्रतिनिधीही उपस्थित होते.

बाबुल सुप्रियो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असतानाच एका कार्यकर्त्याने तुम्ही आधीच उशीरा आल्याचे सांगितले. तसेच आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहात आहे, असे सुनावले. यावर बाबुल सुप्रियो चांगलेच नाराज झाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्या कार्यकर्त्याला केवळ शांत बसण्यास सांगितले. मात्र, माध्यमांशी बोलून झाल्यानंतर त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यालयात नेले आणि थोबाडात लगावली. मारहाणीची घटना प्रसारमाध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. तसेच, हा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यावरून टीएमसीने बाबुल सुप्रियो यांच्यावर निशाणा साधला.

"ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. ममता यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे. "मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे" असं पाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Babul Supriyoबाबुल सुप्रियोBJPभाजपा