शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

West assembly election 2021: बंगालमधील कांठी येथे शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला, टीएमसी नेत्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:17 IST

सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. (West assembly election)

ठळक मुद्देसौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी यथे हल्ला झाला आहे.यावेळी सौमेंदू कारमध्ये नव्हते. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गारघेटा विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याची घटना घडली होती.

कोलकाता - नुकताच टीएमसी सोडून भाजपचा भगवा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी यथे हल्ला झाला आहे. मात्र, यावेळी सौमेंदू कारमध्ये नव्हते. या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. यानंतर या हल्ल्याचा आरोप टीएमसीवर करण्यात येत आहे. आज बंगालमधील 5 जिल्ह्यांत 30 विधानसभा जगांसाठी मतदान होत आहे. (West assembly election 2021 attack on suvendu adhikari brother soumendu adhikari bjp tmc)

तत्पूर्वी, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गारघेटा विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याची घटना घडली होती. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी, मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघातील सतसतमल येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.

West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमध्ये 4 मिनिटांत अचानक घटलं मतदान! TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

टीएमसी नेत्यावर आरोप -सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, मला माहिती मिळाली आहे, की टीएमसीच्या ब्लॉक अध्यक्षाने सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला करवला. यात कारचालकालाही मारहाण करण्यात आली आहे. यात कारचालक जखमी झाला आहे. कारवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात तृणमूल काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार -टीएमसीने निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या टक्केवारीत गडबड झाल्याचे म्हणत लेखी तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे, की कांठी दक्षिण (216) आणि कांठी उत्तर (213) मतदान केंद्रांवर सकाळी 9.13 वाजता मतदानाची  टक्केवारी प्रत्येकी 18.47% आणि 18.95% होती. मात्र, चार मिनिटांनंतर 9.17 वाजता ही टक्केवारी कमी होऊन 10.60% आणि 9:40 टक्क्यांवर आली आहे. ही गडबड आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी. (West Bengal Election Voting)

धक्कादायक! कार्यकर्त्याचा मतदानादिवशीच आढळला मृतदेह; भाजपाने केला हत्येचा गंभीर आरोप

मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात -पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 21 महिलादेखील आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकांत या 30 जागांपैकी 27 ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस