शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

‘व्हीआयपीं’ची खातीही ‘हॅक’ केली गेली का?; सरकारने ट्विटरकडे मागितला सविस्तर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:15 IST

कंपनीला दिली नोटीस

नवी दिल्ली : कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व गोपनीय कोड मिळवून काही हॅकर्सनी राजकारण, समाजकारण व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती व काही आघाडीच्या कंपन्यांची खाती हॅक करून व्यक्तिगत माहिती चोरली, असे टिष्ट्वटरने स्वत:हून जाहीर केल्यानंतर ‘यात कोणी भारतीय व्हीआयपी’सुद्धा आहेत का, अशी विचारणा भारत सरकारने या मायक्रोब्लॉगिंग कंपनीकडे केली आहे.सूत्रांनुसार भारतात सायबर सुरक्षेच्या जपणुकीची जबाबदारी असलेल्या ‘सीईआरटी-इन’ या मुख्य सरकारी संस्थेने  ट्विटर कंपनीस यासंदर्भात सविस्तर नोटीस जारी केली आहे.

 ट्विटर वापरणाºया भारतातील किती जणांची खाती हॅक झाली आहेत? त्यांचा व्यक्तिगत डेटाही चोरण्यात आला आहे का? अशा बाधित खातेधारकांना कळविण्यात आले आहे का, तसेच हॅक केल्यानंतर या खात्यांचा ज्यांनी वापर केला त्यातही कोणी भारतीय आहेत का?  ट्विटरच्या भक्कम सुरक्षा यंत्रणेतील नेमक्या कोणत्या त्रुटींचा फायदा घेत हे हॅकिंग केले गेले व याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, अशा अनेक मुद्यांवर कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

शनिवारी अमेरिकेत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार हॅकर्सनी एकूण १३० ट्विटर खात्यांना लक्ष्य केले. त्यापैकी ४५ खात्यांचे पासवर्ड त्यांनी रिसेट करून त्या खात्यांवरून स्वत: टष्ट्वीट केल्या. त्यांनी ज्या आठ खात्यांची व्यक्तिगत माहिती डाऊनलोड केली ती खाती शहानिशा केलेली नव्हती.

कंपनीच्या म्हणण्यानुसार काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून र्हकर्सनी हे उद्योग केले व त्याठी लागणारी तांत्रिक ‘टूल्स’ त्यांनी कर्मचाºयांकडून लबाडीने मिळविली. ज्यांची खाती हॅक झाली त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आहोत व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असल्याने सर्वच महिती आताच उघड करता येणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.

सायबरतज्ज्ञांच्या मते हॅक केलेल्या  ट्विटर खात्यांचा वापर करून ‘डिजिटल’ चलनावर डल्ला मारणे हा हॅकर्सचा मुख्य उद्देश होता व जाहीररीत्या उपलब्ध असलेली ब्लॉकचेन व्यवहाराच्या माहितीचे विश्लेषण करता या हॅकर्सनी एक लाख डॉलरची ‘क्रिप्टो करन्सी’ मिळविल्याचेही दिसते.

अनेक मान्यवर झाले लक्ष्य

टिष्ट्वटर कंपनीने हॅक केलेल्या खात्यांची मुख्यत्वे अमेरिकेतील खातेदारांची नावे उघड केली आहेत. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ज्यो बायडेन, अब्जाधीश उद्योगपती बिल गेट््स, जेफ बेझोस व इलॉन मस्क, अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट, टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोची ‘स्टार’ किम कर्दाशिआन, रॅप गायक कान्ये वेस्ट यांच्याखेरीज उबर व अ‍ॅप्पल या कंपन्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Twitterट्विटरPoliceपोलिस