सिमकार्डप्रमाणे Jio DTH लाही वेलकम ऑफर !
By Admin | Updated: April 5, 2017 17:19 IST2017-04-05T17:18:53+5:302017-04-05T17:19:12+5:30
जिओ सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर

सिमकार्डप्रमाणे Jio DTH लाही वेलकम ऑफर !
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करण्यास सज्ज आहे. कंपनी आता DTH सर्विस सुरू करणार असून या महिन्यातच सेट टॉप बॉक्स लॉन्च करणार असल्याचं वृत्त आहे.
सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 90 दिवस सर्विस फ्री देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना सर्विस आवडल्यानंतरच त्यांच्याकडून पैसे आकारले जातील असं म्हटलं जात आहे. जिओ आपल्या DTH सर्विससाठी महिन्याला 180 ते 200 रूपये आकारण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 HD चॅनलसह 300 चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे.