'भाजपाला मत हाच आमचा अहेर'; वधू-वरानं लग्नपत्रिकेतून मागितलं अजब गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 16:46 IST2019-01-03T16:45:03+5:302019-01-03T16:46:50+5:30
विवाह बंधनात अडकलेल्या एका वधु-वरांनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत गिफ्ट आणण्याऐवजी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मतदान करा, असं आवाहन केल्याचं समोर आलं आहे.

'भाजपाला मत हाच आमचा अहेर'; वधू-वरानं लग्नपत्रिकेतून मागितलं अजब गिफ्ट
नवी दिल्ली- 2019ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता विवाह बंधनात अडकलेल्या एका वधु-वरांनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत गिफ्ट आणण्याऐवजी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मतदान करा, असं आवाहन केल्याचं समोर आलं आहे. विवाह बंधनात अडकलेल्या वधू-वराची ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये वधू-वरानं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतून 2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देण्याचं आवाहन केलं होतं. मोदींना मत देणारी ही निमंत्रण पत्रिका फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर पसरत आहे. त्या वधू-वरांच्या आई-वडिलांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या खाली लिहिलं होतं की, 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मत म्हणजे आमच्यासाठी ते एक गिफ्टच आहे.
या वधू-वराचं 1 जानेवारी रोजी लग्न झालं. त्यांच्या विवाहाची ती पत्रिका आता सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
तर मंगलोरमध्ये मोदींच्या एका समर्थकानं लग्नपत्रिकेसारखेच मतदान करण्यासाठी एक पत्रिका तयार केली आहे. त्या पत्रिकेत मोदी सरकारनं गेल्या 5 वर्षांमध्ये राबवलेल्या योजनांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो लावण्यात आला आहे. त्या मोदी समर्थकानं ती पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली असून, नरेंद्र मोदींनी ते रिट्विटही केलं आहे.
@narendramodi Sir. With my wedding invitation card, I am trying to explains the lot of achievement, schemes by Modi Govt. & Urging all invitees get the use. Hand to hand helping them to get the max.benefit . I believe "We have to take care of Modi, Modi will take care of nation. pic.twitter.com/tZcgdX7uUw
— Bhushan Branson (@mf5245pd) January 3, 2019