शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मॉलमध्ये बुरखा परिधान करुन 'तिने' केला डान्स, मुस्लिम संघटना भडकल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:01 IST

येथील एका मॉलमध्ये मुस्लिम तरुणीने बुरखा परिधान करुन बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केल्यामुळे येथील काही मुस्लिम संघटनांचा पारा चढला आहे. एका संघटनेने याला तीव्र विरोध केला असून हा प्रकार इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. 

ठळक मुद्दे 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स बुरखा घालून केला डान्स मुस्लिम संघटनांचा पारा चढला

मंगळुरु, दि. 22 - येथील एका मॉलमध्ये मुस्लिम तरुणीने बुरखा परिधान करुन बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केल्यामुळे येथील काही मुस्लिम संघटनांचा पारा चढला आहे. एका संघटनेने याला तीव्र विरोध केला असून हा प्रकार इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मंगळुरुमधील एका मॉलमध्ये आयोजित क्रार्यक्रमात मुस्लिम तरुणीने बुरखा घालून डान्स केला. यावेळी तिच्यासमवेत अन्य काही तरुणी होत्या. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा'  या गाण्यावर डान्स केला. दरम्यान, मॉलमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्या डान्सचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्यांनी डॉन्स केलेला हा व्हिडिओ अवघ्या काही तासांत सोशल मीडियात व्हायरल झाला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील डान्स करणारी मुस्लिम तरुणी कोण आहे, याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. परंतु, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या डान्स केलेल्या मुस्लिम तरुणीवर अनेक मुस्लिम संघटनांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. यामध्ये जास्तकरुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येते. साऊथ कन्नड सलाफी मुव्हमेंटचे उपाध्यक्ष इस्माईल शफी म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करुन डान्स करणे हे इस्लाम धर्माला अनुसरुन नाही. त्यामुळे हा प्रकार धर्माच्या विरोधात आहे. त्या तरुणीने केलेले हे कृत्य चुकीचे आहे. याचबरोबर, बॉलिवूडमध्ये अभिनय करणा-या महिलासुद्धा अनेक दिवसांपासून धर्माच्या विरोधात फोटो, व्हिडिओ शूट करत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणा-या त्या तरुणीने सुद्धा चित्रपटात काम करणा-या महिलांना फॉलो केल्याचे दिसते, असेही इस्माईल शफी म्हणाले. इस्लाम धर्मात पुरुषांसह महिलांना सुद्धा स्वातंत्र्य आहे. मुलींना धार्मिक मूल्यांचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्या आई-वडिलांची आहे. दरम्यान, सध्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओतील तरुणी कोण आहे, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आणि तिच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना धर्माबद्दल माहिती सांगणार असल्याचे इस्लाईल शफी यांनी सांगितले.