शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:24 IST

ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल असं शाह यांनी म्हटलं.

कोलकाता - २०२६ मध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून टाकू. जेव्हाही शुभेंद्रु विधानसभेला उभे राहतात तेव्हा दीदी घाबरते. निवडणुकीत हिंसाचाराचा आधार घेतात. लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. हिंसेविना मतदान घ्या मग तुम्हाला वास्तव काय ते कळेल अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवारी कोलकाताच्या नेताजी स्टेडिअममध्ये भाजपा कार्यकर्त्यांना शाह यांनी संबोधित केले.

यावेळी अमित शाह म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये केवळ निवडणूक मर्यादित नाही तर सुरक्षा हेदेखील महत्त्वाचं कारण आहे. गेली अनेक वर्ष ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येत घुसखोर बांगलादेशातून भारतात प्रवेश करतात. इथे व्होटबँकचे राजकारण केले जाते परंतु हे दीर्घकाळ चालणार नाही. २०१७ च्या निवडणुकीपासूनच आम्ही १९ व्या लोकसभेची तयारी केली होती. २०१५ च्या निवडणुकीत आम्ही ५५ जागा जिंकल्या. २४ व्या लोकसभेत भाजपा ९७ जागा पुढे होती. आम्हाला १४३ जागांवर ४० टक्क्याहून अधिक मते मिळाली. याचा अर्थ टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणखी काही मेहनत घेतली तर पुढील निवडणुकीनंतर आपले सरकार तयार होईल असं शाह यांनी आकडेवारीसह सांगितले.

तसेच मुर्शिदाबाद येथे दंगल झाली, तेव्हा आम्ही ममता बॅनर्जी यांना दंगल रोखण्यासाठी बीएसएफ पाठवण्याचा आग्रह धरला परंतु ममता यांनी त्यावर असहमती दर्शवली. हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर बीएसएफ त्यांना वाचवण्यासाठी पोहचली. मुर्शिदाबादची दंगल राज्य पुरस्कृत होती. मोदी सरकारने वक्फ विधेयक आणून काय चुकीचे केले...वक्फ विधेयकाचा विरोध करून ममता बॅनर्जी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतेय असा सवालही अमित शाह यांनी विचारला.

दरम्यान, संदेशखलीचा मुख्य गुन्हेगार कोण, तो कोणत्या पक्षाशी जोडलेला आहे...जर आम्ही सत्तेत आलो तर सीए कायदा लागू करू. मोदी सरकारने पश्चिम बंगालला ८,२७,००० कोटी दिले, ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल. बंगालमध्ये घुसखोरी रोखायची असेल, हिंदूंवरील अत्याचार कमी करायचे असतील तर  भाजपाला संधी द्या. २०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून फेकू असं अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल