शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:07 IST

हल्ला विसरणार नाही, हल्लेखोरांना माफ करणार नाही; सीआरपीएफची प्रतिज्ञा

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीपाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. यानंतर आता सीआरपीएफनं मोजक्याच मात्र तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि हल्लेखोरांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांमध्ये सीआरपीएफनं हल्लेखोरांना सूचक इशारा दिला आहे. सीआरपीएफनं ट्विट करुन हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरात काल दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. या हौतात्म्यानंतर सीआरपीएफनं दिलेली प्रतिक्रिया अतिशय सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं. सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी तीव्र शब्दांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. दहशतवाद्यांनी खूप मोठी घोडचूक केली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशा शब्दांमध्ये मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं.मोदींच्या कठोर प्रतिक्रियेनंतर आता सीआरपीएफनं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत एक ट्विट केलं आहे. 'आम्ही विसरणार नाही, आम्ही माफही करणार नाही', असं या ट्विटमध्ये सीआरपीएफनं म्हटलं आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. दहशतवाद्यांना थेट आणि स्पष्ट इशारा देणारं सीआरपीएफचं हे ट्विट महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार झाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी