शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

दिल्लीत आपला ५५ जागा मिळतील, महिलांनी धक्का दिला तर...; केजरीवालांचे मोठे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:53 IST

Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. 

दिल्लीत प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. जुन्या प्रचाराप्रमाणे आता कंदील प्रचार सुरु होणार आहे. दिल्ली निवडणुकीत लोकांचा कल कोणाकडे आहे, याबाबतचा सीव्होटरचा अंदाज समोर आला आहे. यात फारसा फरक दिसत नाहीय. असे असताना भाजपा दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी उत्सुक आहे, तर आपला किल्ला टिकवायचा आहे. आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. 

यावेळी माझ्या अंदाजानुसार दिल्लीत ५५ जागा मिळत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. परंतू जर माता - भगिनींनी जोराचा धक्का दिला तर त्या ६० वरही जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले. सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. 

नवी दिल्ली, जंगपुरा, कालकाजी या आपच्या तीन जागा फसल्या आहेत, असा भाजपा दावा करत आहे. परंतू हे लक्षात ठेवा की आप या जागा ऐतिहासिक फरकाने जिंकणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. निवडणुकीतील गैरप्रकार रेकॉर्ड करण्यासाठी झोपडपट्टी भागात स्पाय कॅमेरे आणि बॉडी कॅमेरे वाटले आहेत. भाजपाचे लोक आणि गुंडांची दुष्कृत्ये रोखण्यासाठी हे केले आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हे लोक ३-४ हजार रुपये देऊन त्यांच्या बोटांवर शाई लावणार आहेत. मतदारांनी ही शाई लावून घेऊ नये असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. 

सी व्होटरचा अंदाज काय?"आपली, सरकार बदलण्याची इच्छा आहे का?" असा प्रश्न सी व्होटरने दिल्लीतील मतदारांना विचारला असता. 1 फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार, या प्रश्नावर उत्तर देताना, विद्यमान सराकारच्या कामावर आपण नाराज आहोत आणि यावेळी बदलाची इच्छा असल्याचे 43.9 टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, 10.9 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते नाराज आहेत, पण सरकार बदलण्याची इच्छा नाही. तसेच, 38.3 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाही यामुळे बदलही करू इच्छित नाही.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा