शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Parliament No-confidence Motion: 'आम्हाला नरेंद्र मोदींचं मौन व्रत तोडायचंय'; अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत गौरव गोगोईंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:24 IST

Parliament No-confidence Motion: संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.

राहुल गांधींच्या जागी गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राहुल गांधी यावर चर्चा करण्यासाठी येणार होते, तेव्हा अचानक बदल करून गौरव गोगोई यांना का पुढे केले जात आहे, असा सवाल भाजप खासदारांनी विचारण्यास सुरुवात केली. चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, 'आम्ही हा अविश्वास प्रस्ताव मणिपूरसाठी आणला आहे. मणिपूरचे तरुण न्याय मागतात. मणिपूरच्या मुली न्याय मागत आहे. मणिपूरचा शेतकरी न्याय मागतोय, असं गौरव गोगाई यांनी सांगितले.

मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. 

पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.

गौरव गोगोई पुढे म्हणाले, 'मणिपूरमध्ये भाजपाचे डबल इंजिन निकामी झाले आहे. समाजातील दोन घटकांमध्ये एवढी चिड, एवढा राग आपण कधीच पाहिला नाही. एक वर्ग टेकड्यांवर तर एक वर्ग दरीत राहतो, अशी रेषा राज्यात ओढली गेली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा हवाला देत गौरव गोगोई यांनी सरकारला राजधर्माची आठवण करून दिली आणि मणिपूरमधील दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओचाही उल्लेखही गौरव केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन