शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Triple Talaq: 'मुस्लिम जनता कायदे नव्हे, फक्त आणि फक्त कुराण मानते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:16 IST

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांचं वादग्रस्त विधान

रामपूर: संसदेत तीन तलाक विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्या विधानानं खळबळ माजली आहे. मुस्लिमांना कोणताही कायदा मान्य नाही. मुस्लिम फक्त कुराणला मानतात, असं वादग्रस्त विधान खान यांनी केलं आहे. कुराणमध्ये जे लिहिलंय, तेच मुस्लिम जनता मानेल. मात्र इतर कोणताही कायदा मानणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. त्यांच्या या विधानानं मोठा वाद होण्याची शक्यता आहे. आज लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसनं आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला होता. संसदेत वादळी चर्चा सुरू असताना रामपूरमध्ये आझम खान यांनी तिहेरी तलाकबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 'जे मुस्लिम आहेत, जे कुराणला मानतात, त्यांना तलाकची पूर्ण प्रक्रिया माहिती आहे. तलाकच्या संपूर्ण प्रक्रियेचा तपशील कुराणमध्ये देण्यात आला असल्याची कल्पना त्यांना आहे. त्या प्रक्रियेशिवाय इतर कोणताही कायदा आम्हाला मान्य नाही. फक्त कुराणमधील नियम आम्हाला मान्य आहेत,' असं खान म्हणाले. आम्ही फक्त कुराणचे नियम मानतो, याचा आझम खान यांनी वारंवार पुनरुच्चार केला. 'संपूर्ण जगात मुस्लिम फक्त आणि फक्त कुराणचा कायदा मानतात. याशिवाय आम्ही कोणताही कायदा मानत नाही. हा आमचा धार्मिक विषय आहे. मुस्लिमांसाठी पर्सनल लॉ बोर्ड आहे. आम्ही कसं लग्न करावं, कोणत्या पद्धतीनं लग्न करावं, कसा तलाक द्या, या आमचा वैयक्तिव विषय आहे,' असं खान यांनी म्हटलं.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभा