शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेड इन अमेठीचं स्वप्न आम्ही साकार केलं; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:00 IST

राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींची सभा

अमेठी: राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र आम्ही मेड इन अमेठीचं स्वप्न साकार केलं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. मोदींनी आज अमेठीत अत्याधुनिक क्लाशनिकोव-203 रायफल्सच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑर्डनान्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी 1500 जणांना कारखान्यात रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली. त्यांनी केवळ 200 लोकांना रोजगार दिला. तरुणांचा विश्वासघात करणारे जगात रोजगारावर भाषणं देत फिरत आहेत, अशी टीका मोदींनी केली. 'या ठिकाणी 8-9 वर्षांपूर्वीच काम सुरू व्हायला हवं होतं. कोरबातील या कारखान्याची सुरुवात अत्याधुनिक रायफल्सच्या निर्मितीसाठीच झाली होती. मात्र या कारखान्याचा पूर्ण वापर करण्यात आला नाही. भूमिपूजन झाल्यानंतरची 3 वर्षे या ठिकाणी कोणत्या रायफल्स तयार करायच्या या चर्चेमध्येच गेली. साधी इमारतदेखील उभारली गेली नाही. 2010 मध्ये काम सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र 2013 पर्यंत काम सुरूच झालं नाही. इमारत तयार झाल्यावर बराच काळ रायफल्सची निर्मितीच झाली नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या संथ कारभारावर टीका केली. अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती न झाल्यानं आपल्या वीर जवानांवर अन्याय झाला की नाही, असा सवाल मोदींनी उपस्थित असलेल्या जनतेला विचारला. 'इथल्या संसाधनांवर अन्याय झाला की नाही? रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांवर अन्याय झाला की नाही?,' असे प्रश्न मोदींनी अमेठीतील जनतेला विचारले. '2014 मध्ये आम्ही सबका साथ-सबका विकासची घोषणा दिली होती. अमेठी याचं उदाहरण आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलं, ते आमचे आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, तेदेखील आमचेच. ज्या मतदारसंघात विजयी झालो, तो आमचा आणि पराभूत झालो, तोदेखील आमचाच,' असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस