शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 13:35 IST

कर्नाटकची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती 

कोगनोळी : राष्ट्रवादी पक्ष गमावलेला राष्ट्रीय दर्जा मतांची टक्केवारी वाढवून परत मिळवण्यासाठीच मैदानात उतरलेला आहे. त्यांची सध्या भाजपसोबत बोलणी सुरू आहेत. त्याबद्दलच्या घडामोडी पाहयला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात हा पक्ष आमच्या सोबत किती काळ असेल हे सांगू शकत नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काका पाटील यांच्या कोगनोळी येथील प्रचार सभेमध्ये केला.तर, कर्नाटकातील विद्यमान मंत्री चाळीस टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामे करत नाहीत. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या खाऊमध्येही घोटाळा केला जातो आहे. अशाप्रकारे हे डबल इंजिन सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे काका पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला निवडून देऊन परिवर्तन घडवूया. हेच कर्नाटकातील परिवर्तन देशात बदल घडवून आणेल, असेही चव्हाण म्हणाले. काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कोगनोळी येथे आयोजित प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले.ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चव्हाण पुढे म्हणाले, या कमिशनखोर लोकांना कंटाळून एका अभियंत्याने आत्महत्या केली. आता जनतेनेच काँग्रेस सरकार आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इतर पक्षातील दिग्गज नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे निपाणी मतदारसंघातून काका पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची बनली आहे. पण काकांच्या मागे ही सर्व सामान्य जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे गुलाल आपलाच आहे, असे आवाहन वीरकुमार पाटील यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले.यावेळी आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांकडून 51 हजार तर कोगनोळी ग्रामपंचायत सदस्यांकडून एक लाख रुपयांची देणगी उमेदवार काका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, पंकज खोत, सतीश पाटील, प्रकाश कदम, अनिल कुरणे, कुमार माळी, संजय कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.फक्त टक्केवारीसाठीच मैदानातचाळीस टक्के कमिशन घेऊन काम करणारे विरोधक पैशाच्या टक्केवारीसाठीच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढवून गमावलेला राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठीच राष्ट्रवादी पक्ष मैदानात उतरला असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा