शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार; बाबा रामदेव यांची कोर्टाकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:28 IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

Supreme Curt ( Marathi News ) : बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. माफीनाम्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीसाठी बाबा रामदेव  आणि आचार्य बाळकृष्ण हे दोघेही कोर्टात हजर होते. या दोघांनीही सुप्रीम कोर्टाची माफी मागितली. मात्र पंतजली प्रकरणातील या माफीचा अद्याप स्वीकार केला नसल्याचं सुनावणीनंतर कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. तुम्ही आणखी काही बाबी दाखल करणार होतात, त्याचं काय झालं? असा प्रश्न बाबा रामदेव यांना कोर्टाने विचारला. त्यावर रामदेव यांच्यावतीने मुकुल रोहितगी यांनी उत्तर देत म्हटलं की, आम्ही अद्याप नवीन काही दाखल केलेलं नसून आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागू इच्छितो. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना काही प्रश्न विचारले. "तुम्ही प्रसिद्ध आहात. योग क्षेत्रात तुमचं मोठं कामही आहे. नंतर तुम्ही व्यवसायही करू लागतात. तुम्हाला आम्ही माफी का द्यायला हवी?" असा प्रश्न न्यायाधीश कोहली यांनी बाबा रामदेव यांना विचारला. 

कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बाबा रामदेव यांनी म्हटलं की, "यापुढे आम्ही सतर्क राहू. कोट्यवधी लोग माझ्यासोबत जोडले गेले आहेत, याची मला जाणीव आहे." दरम्यान, नंतर कोर्टाने रामदेव यांच्यावर कठोर शब्दांत आसूड ओढत म्हटलं की, "तुम्ही आमच्या आदेशानंतरही हे सगळं केलं आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे." दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार असून कोर्टाने  बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयpatanjaliपतंजली