शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 09:14 IST

केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत समान नागरी संहिता हा भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) जाहीरनाम्यातील एक महत्वाचा मुद्दा होता. मात्र आता, एकट्याच्या बळावर बहुमत न मिळाल्याने हा कायदा बनविणे भाजपसाठी सोपे नसेल. यासाठी भाजपला टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे.

त्यांच्या या वक्तव्यावर जेडीयूनेही प्रतिक्रिया दिली आहे. इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव केसी त्यागी बुधवारी म्हणाले, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०१७ मध्ये यूसीसीसंदर्भात विधी आयोगाला एक पत्र लिहिले होते. आमची भूमीका आजही तीच आहे. आम्ही युसीसी विरोधात नाही. पण, या मुद्द्यावर सर्वसंमती व्हावी अशी आमची इच्छा आहे.” 

नितीश कुमार यांनी आपल्या पत्रात म्हटले होते, "सरकारने समान नागरिक संहिता आणण्याचा प्रयत्न करायला हवा. हा प्रयत्न स्थाई आणि टिकाऊ असावा. यासाठी व्यापकदृष्ट्या सर्वसंमती व्हायरला हवी. तो एखाद्या आदेशाने थोपवला जाऊ नये." तत्पूर्वी, "यूसीसीकडे राजकीय साधन म्हणून न बघता, सुधारणेच्या रुपाने बघितले जायला हवे, असेही जेडीयूने म्हटले होते." तसेच, यूसीसी सारख्या मुद्यांवर बसून चर्चा करायला हवी आणि समाधान काढायला हवे, असे 16 खासदारांसह एनडीएतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या टीडीपीने म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारUniform Civil Codeसमान नागरी कायदाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा