शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही Name चेंजर नाही, Aim चेंजर - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यसभेत वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:27 IST

विरोधकांच्या प्रचंड गोंधळाला झुगारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या सरकारील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर राज्यसभेतही विरोधकांचा समाचार घेताना मोदींनी आपले सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर असल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्ली - विरोधकांच्या प्रचंड गोंधळाला झुगारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या सरकारील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर राज्यसभेतही विरोधकांचा समाचार घेताना मोदींनी आपले सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधीपक्ष नेेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकार हे गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले, " तुम्ही म्हणालात, आम्ही गेम चेंजर नाही नेम चेंजर आहोत, पण तुम्ही आमच्या  कार्यपद्धतीकड लक्ष दिले असते तर तुम्हाला आम्ही एम चेंजर असल्याचे जाणवले असते. देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आम्ही आराखडा तयार ठेवला आहे."  यावेळी आपल्यावर आणि भाजपावर होत असलेल्या टीकेचाही मोदींनी समाचार घेतला. तुम्ही भाजपावर टीका करता करता भारतावर टीका करू लागता. मोदींवर हल्लाबोल करता करता हिंदुस्थानवर हल्लाबोल करू लागता, असे मोदी म्हणाले. त्याआधी बुधवारी सकाळी लोकसभेमध्येही विरोधकांवर जोरदार टीका केली होती. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे. पण तुम्ही आमच्यावर जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज लोकसभेत उत्तर देत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मोदींचे तब्बल दीड तास भाषण झाले त्यावेळी विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं. यावेळी ते म्हणाले की, 'देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आमची परंपरा आहे.  तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. 'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी भारता डोकलाममध्ये युद्ध करत होता. त्यावेळी तुम्ही चीनच्या लोकांसोबत भेटण्यात व्यस्त होतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा