शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 22:24 IST

आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला अंकुश लावण्यासाठी आम्ही अनेक कामे केली आहेत. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराने देश बर्बाद केला होता. मात्र आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते. 

विरोधकांवर हल्ला चढवताना नाव न घेता मोदी म्हणाले, "बेईमान लोकांना शिक्षा होत आहे, तर प्रामाणिक लोकांचा सन्मान केला जात आहे. माझ्यावर आरोप केला जात आहे की, मोदी लोकांना तुरुंगात टाकत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. पण, देशाची संपत्ती चोरीली असेल तर कुठे रहायला हवे? शोधून-शोधून पाठवायला हवे  की नाही? तुम्हाला हवे, तेच काम मी करत आहे. काही लोक मोठ्या चिंतेत आहेत."

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीचाही केला उल्लेख - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 30 दिवसांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, गरीब तसेच मध्यम वर्गीयांना  सशक्त बनवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, सरकारने कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

2047 वर काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी म्हणाले, जर आपण ठरवले, तर 2047 पर्यंत भारताला विकसित देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आज आपल्याकडे पाहत आहे. देशाला अशक्य वाटणारी हमी आज मी देऊ शकतो, कारण यामागे तुमची ताकद आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचारjailतुरुंगBJPभाजपा