शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 20:27 IST

धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (सोमवार), राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील कथित हिंसाचाराविरोधात भाजप आमदारांनी जोरदार निषेध केला. यामुळे राज्यपाल जगदीप धनखड यांना आपले अभिभाषण करता आले नाही. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आणि असा प्रकार लोकशाहीसाठी लाजिरवाणा असल्याचे म्हणाल्या. यानंतर ममता यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

सभागृहात भाजप आमदारांचा गदारोळ -  राज्यपाल दुपारी 2 वाजता सभागृहात पोहोचले. मात्र त्यांना आपले अभिभाषण देता आले नाही. कारण भाजप आमदार महानगर पालिका निवडणुकीतील हिंसाचारातील कथित पीडित लोकांचे फोटो आणि पोस्टर्स घेऊन थेट आसनापर्यंत पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही. निषेध करत असलेल्या सदस्यांनी सभागृहातच ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.

यानंतर, राज्यपाल सभागृहातून बाहेर पडू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना थांबण्याचे आवाहन केले. यानंतर धनखड यांनी पुन्हा एकदा भाजप सदस्यांना शांत होण्याचे आणि कामकाज चालू देण्याची विनंती केली, मात्र भाजप सदस्यांनी ऐकले नाही. यावर, टीएमसी सदस्यांनीही दुपारी 2.26 वाजताच्या सुमारास भाजपविरोधी घोषणा बाजीला सुरुवात केली. 

धनखड यांच्या शिवाय, विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनीही सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले, पण याचाही काहीच परिणाम झाला नाही. दरम्यान, यानंतर ममता बॅनर्जी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस