शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर; महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सल्ला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:32 IST

धरणांतील पाणीपातळीत चिंताजनक घट झाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सहा राज्यांना पाण्याचा वापर विवेवकाने करण्याचा सल्ला जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : धरणांतील पाणीपातळीत चिंताजनक घट झाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सहा राज्यांना पाण्याचा वापर विवेवकाने करण्याचा सल्ला जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी तामिळनाडूसाठी सल्ला जारी करण्यात आला असून, याच प्रकारे महाराष्टÑ, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मागच्या आठवड्यात इशारावजा सल्लापत्र जारी करण्यात आले, असे केंद्रीय जल आयोगाचे (सीडब्ल्यूसी) सदस्य एस.के. हलदर यांनी सांगितले.गेल्या दहा वर्षांतील जिवंत साठ्याची सरासरी आकडेवारीपेक्षा जलशयांतील पाणीपातळी २० टक्क्यांवर आल्याने केंद्र सरकारकडून उपरोक्त राज्यांना दुष्काळाबाबत इशारावजा सल्ला जारी करण्यात आला. घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जोवर पाणीपातळीत वाढ होत नाही, तोवर धरणांत उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठीच वापर करावा, असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे.देशभरातील मोठ्या ९१ जलशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे केंद्रीय जल आयोगाकडून आकलन केले जाते. केंद्रीय आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पाणीसाठा आकडेवारीनुसार आजघडीला ३५.९९ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. या जलशयांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा हे प्रमाण २२ टक्के आहे. या ९१ जलाशयांची पाणीसाठवण क्षमता एकूण १६१.९९३ अब्ज घनमीटर आहे. ९ मे रोजी संपलेल्या आठवड्यातील उपलब्ध पाणीसाठा २४ टक्के होता. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांतील पाणीटंचाईची स्थिती गंभीर दिसते.गुजरात, महाराष्टÑात ४.१० अब्जघनमीटर जिवंत पाणीसाठा पश्चिम विभागातील गुजरातेत १० आणि महाराष्टÑात १७ जलाशय आहेत. या जलशयांची जिवंत पाणीसाठ्याची एकूण क्षमता ३१.२६ अब्ज घन मीटर आहे. तथापि, १६ मेपर्यंत या जलाशयांतील जिवंत साठा ४.१० अब्ज घन मीटर होती.एकूण जिवंतसाठ्यापेक्षा हे प्रमाण १३ टक्के आहे. मागच्या वर्षात या २७ जलाशयांतील पाणीसाठ्याचे प्रमाण १८ टक्के, तर मागील दहा वर्षांत २२ टक्के होते.दक्षिण भागात आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. या राज्यांतील ३१ जलाशयांतील जिवंत साठ्याची एकूण क्षमता ५१.५९ अब्ज घनमीटर आहे. केंद्रीय जल आयोगाच्या पाहणीनुसार फक्त ६.८६ अब्ज घनमीटर जिवंत साठा आहे. हे प्रमाण एकूण जिवंत साठ्याच्या १३ टक्के आहे.

टॅग्स :Damधरण