शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामांचे भूमिपूजन

By admin | Updated: June 18, 2015 13:44 IST

टेंभुर्णी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभाग सोलापूर व ग्रामपंचायत टेंभुर्णी यांच्या संयुक्त सहकार्यातून १ कोटी ८७ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामाचे भूमिपूजन आ़ बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़

टेंभुर्णी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभाग सोलापूर व ग्रामपंचायत टेंभुर्णी यांच्या संयुक्त सहकार्यातून १ कोटी ८७ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामाचे भूमिपूजन आ़ बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़सोलापूर जिल्‘ातील पथदर्शक प्रकल्प म्हणून उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पामुळे टेंभुर्णी परिसरातील सांडपाणी सध्या अस्तित्वात असलेल्या गटारी, भुयारी गटारी व ज्या ठिकाणी गटारी नाहीत त्या ठिकाणी गटारी बांधून आरसीसी पाईपच्या सहाय्याने एका विहिरीत जमा करून ते २़५ अश्वशक्तीच्या पंपाच्या सहाय्याने नव्याने बांधण्यात येणार्‍या मृदजैव पद्धतीच्या सांडपाणी प्रक्रियावरून शेतीसाठी उपयोगात आणले जाणार आहे़ या प्रकल्पासाठी आय़आय़टी़पवई येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे़ ही योजना पूर्ण करण्यासाठी नाबार्डने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास १ कोटी ८७ लाख ६३ हजार एवढा निधी मंजूर केला असून, हा प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे़यावेळी आ़बबनदादा शिंदे यंाच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार्‍या शुक्रवारपेठ, भुई गल्ली, रामोशी गल्ली येथील १७ लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्‍या भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी शिंदे साखर कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक, उपसरपंच प्रमोद कुटे, डी़के़देशमुख, बंकट देशमुख, ग्रामपंचायत सदस्य योगेश बोबडे, सोमनाथ कदम, कैलास सातपुते, प्रदीप कांबळे, वैभव कुटे, राहुल आरडे, रोहित आरडे, अशोक मिस्कीन, ग्रामसेवक मधुकर माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़