'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:14 IST2020-02-20T16:11:43+5:302020-02-20T16:14:10+5:30

रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.  याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटले होते. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत. 

wasim rizvi says in shaheenbagh protesters are not demanding for their right | 'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत'

'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत'

नवी दिल्ली - पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठवण्यात यायचे. आता मात्र ओवेसी सारख्या व्हायरसने भारतात कसाब तयार करण्यात येत असल्याची घणाघाती टीका शिया सेंट्रल बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली आहे. रिझवी यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन करताना ही टीका केली. 

रिझवी यांनी शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावरही हल्लाबोल केला. शाहीन बाग येथे सुरू असलेले आंदोलन हक्क मागण्यासाठी नसून हिंदूंचा हक्क हिसकावण्यासाठी आहे. पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठविण्यात यायचे, आता ओवेसी व्हायरस येथेच कसाब तयार करत असल्याची टीका रिझवी यांनी केली.

देशात शाहीन बाग सारखीच स्थिती राहिली तर, इस्लामीक दाढी ठेवण्याची पद्धत आणि मिशा काढून फिरणारे चेहरे भारताच्या गंगा, यमुना संस्कृतीला नष्ट करून टाकतील. त्यामुळे शाहीन बाग सारखे हजारो आंदोलने झाले तरी बेहत्तर पण नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यासाठी माघार घेऊ नये, अशी इच्छा रिझवी यांनी व्यक्त केली.

रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.  याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटले होते. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत. 
 

Web Title: wasim rizvi says in shaheenbagh protesters are not demanding for their right