धोऽऽऽधो...पावसाने दाणादाणघरांत पाणी शिरले : दिवसभर होते दमट वातावरण औरंगाबाद : गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झालेल्या धोऽऽधो...पावसाने शहराला झोडपले. दमदार पावसाच्या सरींमुळे शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्तेही जलमय होऊन गेले होते. दिवसभर दमट हवा असल्यामुळे सायंकाळी पाऊस येण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली होती. चिकलठाणा वेधशाळेने रात्री ८.३० वाजेपर्यंत पावसाची नोंद घेतली. रात्री ११.३० वाजेपर्यंत अधिक पाऊस झाल्याचे वेधशाळा सूत्रांकडून सांगण्यात आले. बीड बायपास, अक्षय प्लाझा, बजरंग चौक या भागांतील अनेक घरांत पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाकडे ४० ठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याची नोंद झाली होती. रात्री उशिरापर्यंत दलाचे जवान मदतकार्यात सक्रिय होते. दिवाण देवडी भागातील नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच काही रस्त्यांवर दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. स्वप्ननगरी, जालना रोड, गजानन महाराज मंदिर परिसर, न्यायनगर, पुंडलिकनगर, गजानननगर, गारखेडा परिसरातील अनेक नाल्यांतील पाणी कचरा आणि गाळामुळे रस्त्यावर आले. गेल्या शनिवारी ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. रविवारी ३६ मि. मी. पाऊस पडला. सोमवारी १९ मि. मी. पाऊस पडला. मंगळवार आणि बुधवारीदेखील पावसाने काही भागात हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली.अग्निशामक दलाकडे मदतीसाठी फोनअग्निशमन विभागाचा फोन रात्री ८.३० वाजेनंतर खणखणण्यास सुरुवात झाली. घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक नागरिकांनी मदतीसाठी विभागाकडे फोन केले. रात्री उशिरापर्यंत विभागाचे जवान मदत कार्यासाठी तत्पर होते.
शहरात धो...धो...पाऊस
By admin | Updated: June 19, 2015 14:09 IST