शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'ते प्राचीन मंदिर रातोरात बांधलं का?', संभलमध्ये सापडलेल्या मंदिरावर सीएम योगींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:33 IST

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात प्राचीन मंदिर सापडले आहे.

Sambhal Temple News : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात 46 वर्षे जुने मंदिर सापडले आहे. सध्या या विषयाची देशभरात चर्चा सुरू आहे. यावरच आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'प्रशासनाने रातोरात संभलमध्ये एवढे प्राचीन मंदिर बांधले का? बजरंगबलीची एवढी प्राचीन मूर्ती रातोरात तिथे ठेवली का? संभलमध्ये 46 वर्षांपूर्वी नरसंहार करणाऱ्या गुन्हेगारांना आजपर्यंत शिक्षा का झाली नाही? यावर चर्चा का होत नाही?' असे प्रश्न योगी आदित्यनात यांनी विचारले.

एका कार्यक्रमात अयोध्या आणि संभलचा संदर्भ देत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले गेले, शहरातील रस्ते चौपदरी करण्यात आले. मंदिर बांधले नसते, तर अयोध्येचा एवढा विकास झाला असता का? येथे येणारा प्रत्येक भाविक कृतज्ञता व्यक्त करतो. मंदिरामुळे राज्यघटनेचा गळा घोटणाऱ्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. अयोध्येच्या विकासामुळे त्यांना त्रास होतो, अशी टीका योगींनी यावेळी केली. 

मंदिर कसे सापडले?संभलमधील हिंसाचारानंतर प्रशासनाने शहरभरात अतिक्रमनविरोधी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, शनिवारी मुस्लिमबहुल भागात एक प्राचीन मंदिर सापडले. मंदिराच्या चहुबाजूने अतिक्रमण करुन मंदिर पूर्णपणे झाकण्यात आले होते. या मंदिरात हनुमानाची मूर्ती आणि महादेवाची पिंड आढळली आहे. मंदिराचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंदिराची सफाई केली आणि मंदिर सर्वांसाठी खुले केले. यानंतर हिंदू समाजाने रविवारी मंदिरात विधी आणि मंत्रोच्चाराने पूजा आणि आरती केली.

मंदिरात हनुमान, गणपती, शिवलिंग आणि नंदीमिळालेल्या माहितीनुसार, हे प्राचीन मंदिर शेकडो वर्षे जुने असून, 1978 मध्ये झालेल्या दंगलीनंतर बंद करण्यात आले होते. दंगलीमुळे या भागातील सर्व हिंदू लोक निघून गेले, त्यामुळे या भागातील लोकांनी यावर अतिक्रमण केले. मात्र आता 46 वर्षांनंतर मंदिर पुन्हा उघडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खोदकामादरम्यान मंदिरासमोर एक विहीरही आढळून आली आहे. हे मंदिर सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे. सध्या डीएम आणि एसपींनी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.

घर बांधून मंदिरावर कब्जा केलाअतिरिक्त एसपी श्रीश चंद्र म्हणाले, मंदिराच्या आजुबाजूला घरे बांधून मंदिराचा ताबा मिळवला होता. पण, आता मंदिर उघडण्यात आले असून, मंदिरावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथTempleमंदिरMuslimमुस्लीम