शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:33 IST

पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचा सवाल

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की तीदेखील अपघात होती? असा प्रश्न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,' असं सिंह म्हणाले. राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्यानं आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं भाजपानं दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारकडे एअर स्टाइकचे पुरावे मागितले. यानंतर आता दिग्विजय यांनीदेखील त्यांचीच री ओढली. 'पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,' असं दिग्विजय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  हवाई दलानं 26 फेब्रुवारीला दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइक केला. यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, याची आकडेवारी हवाई दल आणि सरकारनं दिलेली नाही. मात्र भाजपा नेत्यांनी मृत दहशतवाद्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. यावरुनही दिग्विजय सिंह यांनी मोदींनी लक्ष्य केलं. 'पंतप्रधान मोदीजी, तुमच्या सरकारमधले काही मंत्री म्हणतात 300 दहशतवादी मारले. भाजपा अध्यक्ष 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगतात. तर योगी आदित्यनाथ 400 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा करतात. मात्र तुम्ही याबद्दल मौन बाळगलं आहे,' असा टोला दिग्विजय यांनी लगावला. मृत दहशतवाद्यांच्या आकड्यावरुन मोदींवर निशाणा साधणाऱ्या विधानावर व्ही. के. सिंह यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. 'बालाकोटवरील एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची आकडेवारी केवळ एकाच ठिकाणी आहे. ती इतरत्र कुठेही नाही. हवाई दलानं त्यांचं लक्ष्य अतिशय काळजीपूर्वक निवडलं होतं. ते लक्ष्य नागरी वस्तीपासून दूर होतं. त्यामुळे या हल्ल्लाची झळ नागरिकांना बसली नाही,' असं सिंग यांनी सांगितलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाDigvijaya Singhदिग्विजय सिंहindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी