शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

हे काही आभाळातून नाही आले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:16 IST

आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर परखड टीका करणारे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत कोठे होता? आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होणार असेल, तर पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या केलेल्या भक्कम पायाभरणीमुळेच. हे काही आभाळातून आले नाही. ब्रिटिशांनी नव्हे तर भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर यासाठी भक्कम पायाभरणी केली, असे परखड मत व्यक्त करीत माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांंनी काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर आसूड ओढणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या मालवण सभागृहात गुरुवारी त्यांचे व्याख्यान झाले. अन्य सरकारचेही भारताच्या जडणघडणीत योगदान आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर टीका करणाऱ्यांनी हे जरूर ध्यानात घेतले पाहिजे की, स्वातंत्र्याच्या वेळी भारत कोठे होता आणि आम्ही त्याला कोणत्या उंचीवर नेले.स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था शून्य होती. आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी घातलेल्या पायामुळे काँग्रेसच्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था १.८ अब्ज ट्रिलियन डॉलरवर झाली.सार्वजनिक उपदेश सर्व प्रकारचा हिंसाचार, द्वेषापासून मुक्त असावा. सामाजिक आणि राजकीय विपर्यास आणि भरकटलेपणा टाळण्यासाठी राजकारण आणि जनतेपुढील समस्या समजावून घेण्यासाठी प्रामाणिक संवाद करण्याची गरज आहे.भारतीय संविधानामुळे विभिन्न धर्म, पंथ, जाती असताना सर्वांसाठी सामाजिक-आर्थिक समानता मिळाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.>काँग्रेसनेच रचला भक्कम पायाभविष्यात ५ ट्रिलियन डॉलरच्या भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या भक्कम पाया पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांच्यासह आधीच्या सरकारांनी रचला. जवाहरलाल नेहरू आणि इतर धोरणी नेत्यांनी आयआयटी, इस्रो, बँकिंग जाळे आदी स्थापन केल्याने भारताचा विकासाचा वारू चौखूर धावत आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांनी रोवलेल्या उदार अर्थव्यवस्थेच्या मुहूर्तमेढेवर भारताचा विकासाचा डोलारा उभारला आहे. याच भक्कम आधारावर विद्यमान वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होईल, असा ठाम दावा करू शकतात, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी