शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:47 IST

पुढील ४८ तासांत राज्यातील विविध शहरांमधील कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

नवी दिल्ली - पश्चिमी वाऱ्यांच्या बदलामुळे देशभरातील हवामानात अचानक मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. राजधानी दिल्लीसोबतच उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. इतकेच नाही तर गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोणकोणत्या राज्यांत पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या काळात उत्तर पश्चिम भारतात  पाऊस, जोरदार वारा आणि गारपीट सुरू राहील. आज ५ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. ७ आणि ८ एप्रिल रोजी हवामान पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. ८ एप्रिल रोजी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. ५ ते ८ एप्रिल या कालावधीत केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

दिल्ली-यूपीतही पावसाचा कहर

दिल्लीतही मेघगर्जनेसह पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ ते ७ एप्रिल या काळात हवामान बदल होत राहतील. आज संध्याकाळी हलका पाऊस, रिमझिम आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशात गेल्या ४८ तासांपासून वादळ आणि पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आणखी एक अपडेट जारी केले असून त्यानुसार रविवारी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर इतर भागांमध्ये निरभ्र आकाश राहील असा अंदाज वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील विविध शहरांमधील कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

दरम्यान, ५ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये काळ्या ढगांच्या हालचालीसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात आज हवामान निरभ्र राहील. ६ एप्रिल रोजी हवामान विभागाने सर्व ७५ जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवले आहे. ७ एप्रिलपासून राज्यात पुन्हा ढग जमा होऊ लागतील असं लखनौ हवामान केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे. तर बिहारमध्ये ५, ६ आणि ९ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ७ आणि ८ एप्रिल रोजी मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत राहील असंही  हवामान विभागाने म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Weather Alert: Heavy Rain, Storms Forecast Across Multiple States

Web Summary : Western disturbances trigger widespread weather changes. IMD forecasts rain, thunderstorms, hailstorms across North, Central, and South India. Delhi, UP face rain and strong winds. Bihar braces for heavy rainfall and potential hailstorms.
टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाज