सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:58 AM2024-04-05T06:58:59+5:302024-04-05T07:01:21+5:30

Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

War preparedness on the border, strength will increase! Indian Army is planning a new plan; Decisions at the meeting of officers | सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सीमेवर युद्धसज्जता, सामर्थ्य वाढविणार! लष्कर आखतेय नवी योजना; अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली - भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. 

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराकडे असलेली साधनसामग्री, मनुष्यबळ, आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्धसामर्थ्य वाढविण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलली जातील.

लष्कराला लागणाऱ्या संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत भारत आत्मनिर्भर होणे अतिशय आवश्यक आहे. लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असण्याबरोबरच संरक्षणविषयक अन्य सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.

‘लष्कराने दहशतवादाचा केला कठोर मुकाबला’
- देशाच्या सीमांचे रक्षण व दहशतवादाचा मुकाबला लष्कराने समर्थपणे केला आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत म्हणाले.
- सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख मनोज पांडे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचीही भाषणे यावेळी झाली. 

सरकारशिवाय निधी उभारणार
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त आणखी निधी उभारण्याकरिता काय पर्याय अमलात आणता येतील याचा लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचार करण्यात आला. 

लष्करावर गाढ विश्वास
सीमाभागात पायाभूत सुविधांचा होणारा विकास तसेच या भागात संरक्षणदृष्ट्या उचलण्यात आलेली पावले यांच्यात समन्वय साधला 
जाणार आहे.
सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनी अशी बैठक आयोजिण्यात येते. यंदाची बैठक मंगळवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
देशातील ज्या यंत्रणांवर जनतेचा गाढ विश्वास आहे, त्यामध्ये लष्कराचा समावेश होतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या बैठकीत सांगितले होते. 

Web Title: War preparedness on the border, strength will increase! Indian Army is planning a new plan; Decisions at the meeting of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.