शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

ज्या व्यक्तीवरून गलवान खोऱ्याचे पडले नाव, त्याच्या वारसांनी भारत-चीन वादावर दिली अशी प्रतिक्रिया... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:36 IST

१५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेतया भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावालडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे

 लेह (लडाख) -  लडाखमधील गलवान खोऱ्यात सध्या भारत आणि चीनच्या सैन्यदलांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. १५-१६ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आलेले आहेत, अशा तणावाच्या परिस्थितीत या गलवान खोऱ्याला ज्या गुलाम रसूल गलवानच्या नावाने ओळखले जाते त्याच्या वारसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

"गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात खूप काही घटना घडत आहेत. या भागाशी आमचा गेल्या दोनशे वर्षांपासूनच संबंध आहे. युद्ध हा या वादावरील पर्याय असू शकत नाही तर हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा," असे गुलाम रसूल गलवान याचे वारस अमिन गलवान यांनी सांगितले.

लडाखमधील गलवान खोरे आणि गलवान नदी भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी 1962, 1975 आणि सोमवारी चीनसोबत संघर्ष झाला होता. गलवान खोऱ्याचा इतिहास 121 वर्षे जुना आहे. या खोऱ्याचे नावही भारतीय नागरिकावरून पडलेले आहे. लडाखमधील गुराखी गुलाम रसूल गलवान याने ही घाटी शोधली होती. गुलमाने त्याच्या पुस्तकातील "द फाइट ऑफ चाइनीज" या अध्यायामध्ये याबाबत सांगितले आहे.गुलामचा जन्म 1878 मध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडले होते. त्याच्या डोक्यात केवळ नवीन जागा शोधण्याचे विचार घोळत असायचे. याच त्याच्या छंदाने त्याला इंग्रजांचा आवडता गाईड बनविले. खरे पाहता लडाखचा भाग इंग्रजांना आवडत नव्हता.

1899 मध्ये गुलामने लेहहून ट्रेकिंग सुरु केली. आणि लडाखच्या आसपासच्या अनेक नवीन भागांमध्ये पोहोचला. यामध्ये एक होती गलवान खोरे आणि नदी. ही एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल कारण या नदीचे आणि खोऱ्याचे नाव एका गुराख्यावरून ठेवण्यात आले. गुलामने गलवान नावामागे त्याच्या आईने ऐकवलेली कहानी सांगितली आहे. तेव्हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिंदू महाराजांचे राज्य होते. त्याच्या वडिलांचे नाव कर्रा गलवान होते. कर्रा म्हणजे काळा आणि गलवान म्हणजे डाकू, दरोडेखोर. कर्रा त्याच्या टोळक्याचा म्होरक्या होता. तो फक्त श्रीमंतांना लुटत होता आणि मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटत होता.

काही काळानंतर गुलामच्या वडिलांना म्हणजेच कर्राला डोगरा राजाच्या शिपायांनी पकडले आणि मृत्यूदंड दिला. यानंतर गलवान टोळीचे लोक लेह आणि बाल्टिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. तर काही गलवान हे चीनच्या शिंजियांग प्रांताच्या यारकन्दमध्ये स्थायिक झाले. फॉरसिकिंग पॅराडाईज पुस्तकानुसार गुलाम रसूल 15 महिन्यांमध्ये आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा केली होती. लेहच्या चंस्पा योरतुंग रोडवर गुलाम रसूलच्या पूर्वजांचे घर आहे. त्यांच्या नावे गलवान गेस्ट हाऊसही आहे. आता त्यांची चौथी पीढी तिथे राहत आहे. त्यांचे वारसदार येणाऱ्या पाहुण्यांना रसूलचे किस्से सांगतात.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन