शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

‘वक्फ’ला करता येणार नाही संपत्तीवर सहज दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 03:38 IST

Waqf Board Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक हे कोणताही धर्म किंवा धार्मिक समुदायाविरोधात नाही. वक्फ संपत्तीचा मुस्लिमांच्या कल्याणासाठी योग्य वापर करण्याकरिता हे विधेयक तयार करण्यात आल्याचा दावा केंद्रातील भाजप सरकारने केला आहे.

 नवी दिल्ली  - वक्फ सुधारणा विधेयक हे कोणताही धर्म किंवा धार्मिक समुदायाविरोधात नाही. वक्फ संपत्तीचा मुस्लिमांच्या कल्याणासाठी योग्य वापर करण्याकरिता हे विधेयक तयार करण्यात आल्याचा दावा केंद्रातील भाजप सरकारने केला आहे.

वक्फ सुधारणा विधेयकामुळे केंद्र सरकारचे अधिकार वाढणार आहेत. वक्फ ट्रायब्युनल, वक्फ कौन्सिल यांच्या रचनेत बदल होणार असून तेथे बिगर मुस्लीम सदस्यांची वर्णी लागणार आहे. तसेच व वक्फ ट्रायब्युलनच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार आहे. हे निर्णय मुस्लिमांच्या फायद्याचे असल्याचा दावा सरकारने केला आहे. तर वक्फ सुधारणा विधेयकात नक्की कोणते बदल होणार आहेत, त्याचा सविस्तर आढावा. 

जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार कमी होणारआता जिल्हाधिकाऱ्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्याला संपत्तीच्या मालकीचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला जाणार. हा अधिकारी राज्य सरकारतर्फे नियुक्त केला जाईल. 

वक्फकडे किती स्थावर व जंगम संपत्ती आहे?  वक्फ ॲसेट्स मॅनेजमेंट सिस्टिम ऑफ इंडियानुसार वक्फच्या नावावर ८,७२,८०४ स्थावर संपत्ती नोंदणीकृत आहेत. तर १६,७१६ जंगम मालमत्ता इतक्या आहेत. 

वक्फ ट्रायब्युलनच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणारवक्फ ट्रायब्युलनच्या निर्णयाला दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल. वक्फ ट्रायब्युनलच्या निर्णयाविरोधात ९० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल, अशी तरतूद वक्फ सुधारणा विधेयकात आहे.वक्फकडून कोणत्याही जमिनीवर सहज दावा करता येणार नाही. केवळ दान म्हणून मिळालेल्या जमिनीच वक्फच्या संपत्तीत समाविष्ट होतील.  वक्फच्या सर्व संपत्तीची नोंद एका पोर्टलवर केली जाणार आहे. सरकारी जमिनींवरील दाव्यांची चौकशी केली जाईल.केवळ एखादी जागा नमाजासाठी वापरली जात आहे म्हणून तिथे वक्फचा दावा ग्राह्य धरला जाणार नाही.  

केंद्राचे अधिकार वाढणारवक्फच्या नोंदणी, खाते व्यवस्थापन व लेखापरीक्षणासंबंधी नियमात केंद्र सरकार बदल करू शकते. कॅग किंवा इतर नियुक्त अधिकाऱ्यामार्फत वक्फच्या हिशोबांचे लेखापरीक्षण करता येईल. विधेयकानुसार बोहरा आणि आगाखानी मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड तयार करण्यास परवानगी दिली जाईल.

रचनेत होणार बदल वक्फ ट्रायब्युनलमध्ये ३ सदस्य असतील.  एक सदस्य मुस्लीम कायद्याचा जाणकार असेल.  या ट्रायब्युनलचे अध्यक्षपद सेवानिवृत्त किंवा विद्यमान जिल्हा न्यायाधीशांकडे असेल.  तिसरा सदस्य हा राज्य सरकारमधील सहसचिव दर्जाचा अधिकारी असेल.  

वक्फ कौन्सिलमध्ये बदलयामध्ये किमान २ सदस्य बिगरमुस्लीम असतील.  नियुक्त केलेले खासदार, माजी न्यायाधीश आणि इतर मान्यवर मुस्लीम असणे गरजेचे नाही. मुस्लीम सदस्यांमध्ये २ महिला असणे आवश्यक.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCentral Governmentकेंद्र सरकार