शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

"मी इशारा देतोय, वक्फची एक इंचही संपत्ती सोडणार नाही’’, असदुद्दीन ओवेसींचा व्हिडीओ व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:02 IST

waqf board amendment bill : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकाला तीव्र विरोध केला. तसेच सध्याच्या स्वरूपात हे विधेयक सादर करण्यावरून त्यांनी मोदी सरकारला इशाराही दिला आहे. या

मागच्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशातील राजकारणामध्ये मोठी घुसळण होत आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपा मित्रपक्षांच्या मदतीने हे विधेयक पारित करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तर विरोधी पक्षांकडून मात्र या विधेयकाला विरोध होत आहे. दरम्यान, विधेयकामुळे देशात सामाजित अस्थिरता निर्माण होईल. मुस्लिम समाजाने या विधेयकाला त्याच्या सध्याच्या स्वरूपात नाकारलेलं आहे.  कारण हे विधेयक भारतीय राज्यघटनेमधील कलम २५, २६ आणि १४ चं उल्लंघन करतं, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान सांगितले की, मी सरकारला सावधगिरीचा इशारा देतो की, जर तुम्ही सध्याच्या स्वरूपात वक्फ विधेयक संसदेत आणलं आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं तर त्यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. हे विधेयक संपूर्ण मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे. वक्फ विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याचं कायद्यात रूपांतर झालं तर ते घटनेतील कलम २५, २६ आणि १४ चं उल्लंघन ठरेल. आम्ही कुठलीही वक्फ संपत्ती सोडणार नाही. काहीही सोडणार नाही.  

हे विधेयक देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरेल असा दावा करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तुम्हाला विकसित भारत बनवायचा आहे. आम्हालाही विकसित भारत बनवायचा आहे. मात्र तुम्ही देशाला ८० आणि ९० च्या दशकात घेऊन जाऊ इच्छित आहात. जर असं काही घडलं तर ती तुमची जबाबदारी असेल. कारण एक सन्माननीय भारतीय मुसलमान म्हणून मी माझ्या मशिदीचा एक इंच भागही गमावणार नाही. मी माझ्या दर्ग्याचा एक इंच भागही गमावणार नाही. मी याची परवानगी देणार नाही.  आम्ही येते येऊन मुत्सद्देगिरीची चर्चा करणार नाही. हे ते सभागृह आहे जिथे उभं राहून मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की, माझ्या समुदायामधील लोक हे सन्माननीय भारतीय आहेत. ही आमची संपत्ती आहे. ती कुणीही आम्हाला दिलेली नाही. तुम्ही ती आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत, असेही ओवेसी म्हणाले. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीCentral Governmentकेंद्र सरकारAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन