राज्याला प्रतिक्षा जोरदार पावसाची

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

पुणे : कोकणचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात सध्या तुरळक पाऊस पडत आहे. जुलै महिना उलटून गेला तरी राज्याला अद्याप जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. रविवारीही राज्यातील काही भाग वगळता अन्यत्र केवळ ढगाळ वातावरण होते. तसेच पुढील काही दिवस पावसाची अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Waiting for the state is very strong | राज्याला प्रतिक्षा जोरदार पावसाची

राज्याला प्रतिक्षा जोरदार पावसाची

णे : कोकणचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात सध्या तुरळक पाऊस पडत आहे. जुलै महिना उलटून गेला तरी राज्याला अद्याप जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. रविवारीही राज्यातील काही भाग वगळता अन्यत्र केवळ ढगाळ वातावरण होते. तसेच पुढील काही दिवस पावसाची अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
जून महिन्यांत सलग चार-पाच दिवस पडल्यानंतर पावसाने राज्याकडे पाठ फिरवली आहे. काही दिवसांपूर्वी दोन-तीन दिवस पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. पण त्यानंतर राज्याच्या अनेक भागात केवळ पावसाचे ढग दिसत आहेत. कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि नाशिक येथे तर विदर्भात ब्रम्हपुरी येथे पाऊस पडला. मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी कोकणात काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यात काही भागात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिमीमध्ये) - पुणे २, कोल्हापूर ०.६, महाबळेश्वर ८, नाशिक १, रत्नागिरी २, डहाणू ०.२.
---

Web Title: Waiting for the state is very strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.