पावसाळी नाल्यांना प्रतिक्षा स्वच्छतेची
By Admin | Updated: May 8, 2014 22:06 IST2014-05-08T22:06:32+5:302014-05-08T22:06:32+5:30
पावसाळयापुर्वी नाले स्वच्छतेची मागणी

पावसाळी नाल्यांना प्रतिक्षा स्वच्छतेची
प वसाळयापुर्वी नाले स्वच्छतेची मागणी पंचवटी : पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी शिल्लक असला तरी प्रशासनाकडून पावसाळयापुर्वीची कामे करण्यासाठी प्रारंभ झालेला नाही. पावसाळयात सर्वाधिक डोकेदुखी पावसाळी नाल्याची ठरत असल्याने प्रशासनाने पावसाळयापुर्वी नाले सफाईचे काम करणे गरजेचे आहे. पंचवटी परिसरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रस्त्यालगत पावसाळी नाले तयार केलेले आहे. हे नाले केवळ पावसाळा सुरू होण्यापुर्वी लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यानंतर स्वच्छ केले जातात मात्र इतरवेळी या नाल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाल्यात माती, दगड, कचरा साचून नाले भरगच्च होतात त्यामुळे दरवर्षी पावसाळयाच्या कालावधीत पावसाळी नाले तुडूंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असते. परिसरातील अनेक नाले सध्या माती, दगड व केरकचरा यामुळे बुजले असुन ऐन पावसाळयात या नाल्यात पावसाचे पाणी साचून ते रस्त्यावर वाहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पावसाळी नाल्यांना स्वच्छतेची प्रतिक्षा करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाने तत्काळ परिसरातील नाल्यांची पाहणी करून ते पावसाळा सुरू होण्यापुर्वी स्वच्छ केल्यास पावसाळयात पाणी साचून रस्त्यावर वाहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणच्या नाल्यात दगड, माती साचल्याने पावसाळी नाले होते की नाही हे लक्षात येत नाही. (वार्ताहर)