शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या प्रतीक्षेत देश तहानलेलाच; जून महिन्यात ३७ टक्के कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 06:33 IST

हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे संपूर्ण देशाला घाम फुटला आहे. ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजविले आहे.

इशान्येकडील राज्यांमध्ये पूर आला आहे. त्याचवेळी उर्वरित देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ५४ आणि बिहारमधील ४४ जणांचा समावेश आहे. हवामान खात्याने नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

‘बिपोरजॉय’ चक्रीवाळामुळे मान्सून काही दिवसांपासून तळकोकणातच रेंगाळला आहे. तोदेखील हळूहळू पुढे सरकणार आहे. त्यामुळे पावसासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षाच आहे. २३ ते २९ जून या काळात तळकोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या राज्यांना उष्णतेचा फटकाउत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत मान्सून दाखल होतो. यावेळी पावसासाठी ही राज्ये आतुरलेली आहेत.

या राज्यांना पावसाचा तडाखाअरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस पडत आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. १३ जिल्ह्यांतील ३८ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. केरळमध्ये पावसाने हजेरी लावली असून तेथे संततधार सुरू आहे. तर तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

उष्णतेच्या लाटेत ९८ मृत्यूउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात १५, १६ आणि १७ जून रोजी ४०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बहुतेकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. येथील तापमान ४४ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. बिहारमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये रेड तर आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सर्व शाळा तसेच अंगणवाड्यांना २४ जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. 

आंतरराज्य स्पर्धेत धावपटू पडली बेशुद्धओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेत पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारला मिळाली आहे, ज्यात बालासोर जिल्ह्यातील एक मृत्यूचा समावेश आहे. इतर मृत्यूंचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत महिला धावपटू तेजस्विनी शंकर उष्णतेमुळे बेशुद्ध पडली. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघातRainपाऊस