शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीची शिफारस

By admin | Updated: July 3, 2015 02:57 IST

संसदीय समितीने खासदारांच्या वेतन आणि दैनंदिन भत्त्यांमध्ये शंभर टक्के म्हणजे दुपटीपर्यंत वाढीची शिफारस केली आहे. माजी खासदारांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातही ७५ टक्के

नवी दिल्ली : संसदीय समितीने खासदारांच्या वेतन आणि दैनंदिन भत्त्यांमध्ये शंभर टक्के म्हणजे दुपटीपर्यंत वाढीची शिफारस केली आहे. माजी खासदारांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातही ७५ टक्के एवढी भरघोस वाढ सुचविण्यात आली आहे. माजी खासदारांसोबत प्रवास करणाऱ्यालाही( पती किंवा पत्नीऐवजी) सवलत देण्याबाबत बदल सुचविण्यात आला, हे उल्लेखनीय.भाजपाचे गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने एकूण आठ शिफारशी केल्या आहेत. खासदारांना सध्या असलेले ५० हजारांचे वेतन दुप्पट करण्यासह माजी खासदारांना दिले जाणारे निवृत्तीवेतन सध्याच्या २० हजारांवरून ३५ हजार करण्यालाही समितीने अनुकूलता दर्शविली आहे. अधिवेशनकाळात सभागृहातील कामकाजाला हजेरी लावण्यासाठी खासदारांना दररोज २ हजार रुपये भत्ता दिला जातो. तो दुप्पट करण्याची शिफारस समितीने केली. माजी खासदारांना रेल्वे प्रवासासाठी प्रथम श्रेणीचे तिकीट दिले जात असले तरी त्यांच्या पत्नींना(किंवा पतींना) दुसऱ्या श्रेणीचे तिकीट दिले जात असल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. माजी खासदारांसोबत प्रवास करणाऱ्या साथीदारालाही प्रथम श्रेणीचेच तिकीट द्यावे. त्यांना वर्षातून पाचवेळा विमानाच्या इकॉनॉमी श्रेणीतून प्रवासाची संधी दिली जावी, असे समितीने सुचविले आहे. विद्यमान खासदारांना विमानाच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून वर्षभरात ३६ वेळा मोफत प्रवासाची सुविधा असते. खासदारांना मंत्रिमंडळ सचिवाच्या वरचे स्थान असल्यामुळे त्याप्रमाणे सुविधा दिल्या जाव्यात. खासदारांच्या विवाहित मुलांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जावा, असेही समितीने स्पष्ट केले आहे. या समितीने काही शिफारशी बैठकीचे इतिवृत्त म्हणून यापूर्वीच संसदीय कार्य मंत्रालयाला सादर केल्या आहेत. १३ जुलैला होणाऱ्या पुढील बैठकीत काही शिफारशींना अंतिम स्वरूप दिले जाईल. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये खासदारांच्या वेतनात सुधारणा करण्यात आल्या होत्या. सदर समितीने शिफारशी सादर केल्यानंतर पुढील वेतन सुधारणा पाच वर्षांनंतर पार पाडल्या जातील. उत्तर प्रदेशातील राज्यसभा सदस्य सतीशचंद्र मिश्र आणि काँग्रेसचे प्रमोद तिवारी हे सुद्धा या समितीचे सदस्य आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वतंत्र यंत्रणा असावीमाकपचे नेते के.एन. बालगोपाल यांनी खासदारांचे वेतन आणि भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. खासदारांनी आपले वेतन वाढवू नये, असे स्पष्ट केले आहे. जेडीयूचे खा. के.सी. त्यागी यांनी स्वतंत्र मंडळाची मागणी केली. भारत हा राष्ट्रकुल सदस्य असल्यामुळे येथील खासदारांचे वेतन आणि भत्ते त्या स्तरावरील असावे असेही समितीतील काही सदस्यांनी सुचविले होते. बरेच खासदार अविवाहित असल्यामुळे त्यांच्यासोबत (पती किंवा पत्नीऐवजी) असणाऱ्याला प्रवास सवलत देण्याचे सुचविण्यात आले. सध्या रेल्वेत प्रथमश्रेणी नसल्यामुळे खासदारांना एसी फर्स्ट क्लासचे भाडे आणि भत्ते दिले जावे, असेही समितीच्या काही सदस्यांनी सुचविले आहे.