शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VVIP हेलिकॉप्टर घोटाळा : मध्यस्थ जेम्सला दुबईतून भारतात आणण्यासाठी EDची मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 09:08 IST

बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. ईडीने हे आरोपपत्र दुबईमधील न्यायालयात जेम्स क्रिस्टियन मायकलच्या प्रत्यार्पणाचा पुरावा म्हणून सादर केले आहे. 

नवी दिल्ली - बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. ईडीने हे आरोपपत्र दुबईमधील न्यायालयात जेम्स क्रिस्टियन मायकलच्या प्रत्यार्पणाचा पुरावा म्हणून सादर केले आहे.  जेम्स हा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ आहे. या आरोपपत्रामध्ये 34 भारतीय आणि परदेशी नागरिक आणि कंपन्यांची नावे आहेत. जेम्स हा जून महिन्यापासून तुरुंगात असून, भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील आहेत.    भारत सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्सला भारतात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. दरम्यान भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली नसल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सर्व कागदपत्रे यूएईमधील न्यायालयात जमा करण्यात आली आहेत. तसेच तपासादरम्यान अजून कागदपत्रांची  गरज पडल्यास तीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. भारत सरकारच्या विनंतीवरून जेम्सला दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये जेम्सची चौकशी केली होती. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी विनंती केली होती.   ब्रिटीश नागरिक असलेला जेम्स हा ऑगस्ट वेस्टलँड व्यवहारातील तीन मध्यस्थांपैकी एक आहे. या व्यवहारादरम्यान 1997 ते 2013 या काळात जेम्सने तीनशेवेळा भारताचा दौरा केला होता. दरम्यान या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर तो. दुबईला पसार झाला होता.   

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयIndiaभारत