शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे, शूरवीरांचे नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 08:54 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले आहे. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये  सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे.

डेहराडून - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही' असे म्हटले आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. तसेच यावरून राजकारण करू पाहणाऱ्यांना मृतदेह मोजायचे काम गिधाडांचे असते शूरवीरांचे नाही असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला आहे. 

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सोमवारी (1 एप्रिल) एका प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजनाथ सिंह या रॅलीमध्ये  सहभागी झाले असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 1971 ला स्व. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांनी संसदेमध्ये उभे राहून त्यांची प्रशंसा केली होती. त्यावेळी पाकिस्तानला धूळ चारल्यामुळे इंदिरा गांधींचा जयजयकार होत असेल तर आता पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदींची प्रशंसा का होत नाही? मोदींची प्रशंसा करण्याऐवजी काँग्रेसला एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार झाले हे जाणून घेण्यात रस आहे. परंतु शूरवीर मृतदेह मोजत बसतात का? मृतदेह मोजण्याचे काम वीरांचे नाही तर गिधाडांचे असल्याचा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला आहे.

 

किती दहशतवादी मारले, हे पाकिस्तानात जाऊन मोजा, राजनाथ यांचा काँग्रेस नेत्यांना टोला

बालाकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना काही दिवसांपूर्वी लगावला होता. आज नाही तर उद्या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे उघड होईलच मात्र यावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. यावर राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत आपले हवाई दल त्याठिकाणी जाऊन किती दहशतवादी मारले याची संख्या मोजत बसेल काय ? हा खेळ मांडला आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. एनटीआरओ ही एक प्रामाणिक संस्था आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी 300 मोबाईल नेटवर्क सुरू असल्याची माहिती मिळाली. हे मोबाईल फोन कोणत्या झाडाला लावले होते का ? की एनटीआरओवरही तुमचा विश्वास नाही अशी टीका केली होती. 

चौकीदार चोर नव्हे, प्युअर; पुन्हा पीएम होणं शुअर; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

भाजपा आणि काँग्रेसमध्ये चौकीदारवरुन चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है अशी घोषणा वारंवार केली आहे. त्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चौकीदार चोर नाही, तर प्युअर आहे, असं सिंह म्हणाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीत भाषण करताना राजनाथ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. 'चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है', असं राजनाथ सिंह भाजपाच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है, असा आरोप केला होता. त्यानंतर चौकीदार चोर है अशी घोषणा देशभरात गाजली. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते स्वत:च चोर आहेत, असा खळबळजनक राहुल गांधींनी केला होता. 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक