पंतप्रधान मोदींची बदनामी करणा-या व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 12:58 IST2016-10-05T12:58:38+5:302016-10-05T12:58:38+5:30

भाजप कार्यकर्त्यांनी बारहान पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक झाली. या दोघांपैकी एक ग्रुप अॅडमिन आहे.

Votus app group adman arrested for defaming Prime Minister Modi | पंतप्रधान मोदींची बदनामी करणा-या व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

पंतप्रधान मोदींची बदनामी करणा-या व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

 ऑनलाइन लोकमत 

आग्रा, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी आग्र्यामधील दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी बारहान पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक झाली. या दोघांपैकी एक ग्रुप अॅडमिन आहे. 
 
भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ बी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती बाराहान पोलिस स्टेशनचे निरीक्षक योगेंद्र यादव यांनी दिली. आझाद खान नावाच्या युवकाने पंतप्रधान मोदींचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले. ग्रुप अॅडमिन अरीफने याचा साधा निषेधही केला नाही म्हणून तक्रार नोंदवली असे पुशपेंद्र सिसोदीया यांनी सांगितले. 
 

Web Title: Votus app group adman arrested for defaming Prime Minister Modi