शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 09:39 IST

नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही. स्थलांतरित मतदारांना वास्तव्य असलेल्या ठिकाणाहून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रणाली केंद्रीय निवडणूक आयोगाने विकसित केली आहे.

स्थलांतरणामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. स्थलांतरित मतदारांची संख्या अधिक  आहे. ही स्थिती योग्य नसून, विज्ञान युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असल्याचे निवडणूक आयोगाने या पथदर्शी प्रकल्पाची संकल्पना मांडताना म्हटले आहे. देशातील स्थलांतरित मतदारांची अचूक माहिती उपलब्ध नसल्याचे कबूल करून निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की, लग्न, शिक्षणामुळे अनेकांना स्थलांतरित व्हावे लागते. 

जवळपास ८५ टक्के स्थलांतरित मतदार हे आपल्याच राज्यात दुसरीकडे वास्तव्याला राहतात. हा प्रकल्प राबविण्यात निवडणूक आयोगाला कायदेशीर, प्रशासकीय व तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी निवडणूक कायद्यात बदल करावे लागणार आहेत. तसेच मतदार कोण, याची व्याख्या निश्चित करावी लागणार आहे.

१६ जानेवारीला प्रात्यक्षिक दाखविणार

- या प्रायोगिक प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पाचारण केले आहे. एकाच रिमोट ईव्हीएम मतदान केंद्रातून ७२ मतदारसंघांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होईल, असा दावाही निवडणूक आयोगाने केला आहे. 

- निवडणूक आयोगाने ८ राष्ट्रीय राजकीय पक्ष व ५७ प्रादेशिक पक्षांना येत्या १६ जानेवारीला प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पाचारण केले आहे. यात रिमोट ईव्हीएमद्वारे मतदान कसे होईल, हे स्पष्ट होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग