शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने दाबले चुकीचे बटन, 140 मते डिलीट, पुन्हा होणार मतदान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:06 IST

निवडणूक आयोगाने आग्रा मतदान केंद्र क्रमांक 455 वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आग्रा : निवडणूक आयोगाने आग्रामतदान केंद्र क्रमांक 455 वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याकडून चुकीचे बटन दाबले गेल्याने 140 मतं डिलीट झाली. यामुळे निवडणूक आयोगाने 25 एप्रिलला पुन्हा मतदान घेण्याची तयारी दर्शविली आहे.  

आग्रा लोकसभा मतदार संघासाठी गेल्या 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी मतदान केंद्र 455 वर तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता पुन्हा याठिकाणी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांकडून सुद्धा याठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात येत होती.  

लोकसभा निवडणुकीसाठी 18 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील नगीना, अमरोहा, बुलंदशहर, अलीगड, मथुरा, हाथरस, आग्रा आणि फतेहपूर सीकरी या मतदार संघात मतदान झाले होते. मथुरा मतदारसंघातून अभिनेत्री हेमा मालिनी, फतेहपूर सीकरीमधून काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, आग्रामधून ए.सी बघेल आणि अमरोहा मतदार संघातून बसपा उमेदवार दानिश अली निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

दरम्यान, मतदानाच्या तिस-या टप्प्यात आज देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे. 

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकagra-pcआग्रा