शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:33 IST

Election 2024: हरयाणा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने EVM वर प्रश्न उपस्थित करत आहे.

Maharashtra-Jharkhand Assembly Election 2024: निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. या दोन राज्यांसोबतच इतर 13 राज्यांतील पोटनिवडणुकीची घोषणाही आज केली जाणार आहे. दरम्यान, निवडणूक तारखांच्या घोषणेपूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी EVM वर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम योग्य असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. ईव्हीएम 100 टक्के निर्दोष आहेत. जनता मतदानात सहभागी होऊन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ईव्हीएमवर कुणी प्रश्न उपस्थित केला?हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममधील त्रुटी सांगितल्या. याप्रकरणी त्यांनी मशीनच्या बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली. यानंतर राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या ईव्हीएम व्यवस्थेमुळे मतदार म्हणून त्यांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले. पोस्टल बॅलेटच्या मोजणीनुसार मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने बहुतांश जागा जिंकल्याचा दावाही त्यांनी केला.

बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ते मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jharkhandझारखंडcongressकाँग्रेस