शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:02 IST

इंडिया आघाडीलाही आश्चर्यकारक यश मिळण्याची आशा

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. १९ एप्रिलपासून सर्व सहा टप्प्यांमध्ये मतदान होत असल्याने राजकीय विश्लेषकांमध्येही मतमतांतरे दिसत आहेत. सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी आहे. १ जून रोजीच्या संभाव्य एक्झिट पोलमधून काही स्पष्टता मिळू शकते. तथापि, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असा दावा एनडीएचे नेते करत आहेत, तर इंडिया आघाडीला आश्चर्यकारक संख्या मिळण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधानांनी दिल्या ७१ मुलाखती

आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे बहुसंख्य शहरी मतदारसंघांत चेन्नई, लखनौ, गांधीनगर, मुंबई उत्तर, जयपूर, गुवाहाटी, जबलपूर, मथुरा, दिल्ली एनसीटी आणि इतर शहरांत २ टक्के ते १२ टक्के कमी मतदान झाले आहे. पंतप्रधानांनी मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल ७१ मुलाखती दिल्या. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने सूचित केले आहे की, दावा केल्याप्रमाणे ३७० नव्हे तर ३०३ ची २०१९ ची संख्या कायम ठेवण्यात त्यांना खूप आनंद होईल.

आकडे बोलतात...

  • २०१४ मध्ये ६७ टक्क्यांहून अधिक व २०१९ मध्ये ६८.६% मतदान झाले होते. त्या तुलनेत २०२४ मध्ये मतदान कमी झाले. त्यामुळे आकड्यांचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. 
  • मतदारांची उदासीनता, कमी झालेली मोदी लाट, उष्णतेची लाट आणि इतर कारणांमुळे कमी मतदान दिसून आल्याचे अनेकांना वाटते.
  • सहाव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६३.४ टक्के झाली हे भाजपसाठी सकारात्मक आहे.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस