शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:30 IST

Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.

Rahul Gandhi Voter Adhikar Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव सध्या व्होट अधिकार यात्रेनिमित्त बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या यात्रेदरम्यान, राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. आजही अररिया येथे दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी पुन्हा एकदा आरोप केला की, देशभरात मते चोरीला जात आहेत आणि निवडणूक आयोग यावर गप्प आहे. तर, तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला "गोदी आयोग" म्हटले.    

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला प्रश्न 

राहुल गांधी म्हणाले की, आता कोट्यवधी लोक असे मानतात की, मते चोरीला जात आहेत. आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदार यादी मागितली, पण दिली नाही. मते कशी चोरीला जातात, हे आम्ही कर्नाटकात दाखवून दिले. मात्र, आम्ही बिहारमध्ये हे होऊ देणार नाही. मी कर्नाटकातील महादेवपुरा संबंधित डेटा ठेवला आणि निवडणूक आयोगाला विचारले की, १ लाख बनावट मतदार कुठून आले? निवडणूक आयोगाचे उत्तर अद्याप आलेले नाही. 

निवडणूक आयोगाने मला प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र आयोगाने अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागितले नाही. मी बनावट मतदारांबद्दल बोललो, अनुराग ठाकूर यांनीही तेच सांगितले, परंतु निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र न मागणे हे दर्शविते की, निवडणूक आयोग तटस्थ नाही. बिहारमधील SIR ही संस्थात्मक मत चोरीची एक पद्धत आहे. बिहारमध्ये ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आली, परंतु भाजप एकही तक्रार करत नाही. कारण निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त आणि भाजप यांच्यात भागीदारी आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

निवडणूक आयोग भाजपचा कार्यकर्ता- तेजस्वी यादव तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, आता निवडणूक आयोग एक लॅपडॉग आयोग बनला आहे. ते भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. आजपर्यंत आम्ही इतका खोटारडा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. अफवा पसरवणे हे त्यांचे काम आहे. जेव्हा ते बिहारमध्ये आले तेव्हा त्यांनी घुसखोरांचा उल्लेख केला, परंतु निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात घुसखोराचे एकही नाव नाही, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रBiharबिहार