शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ची अनोखी शपथ, 'आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न नको'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:39 IST

सुरतमधील लाफ्टर क्लब आणि क्राईंग क्लबचे संस्थापक आणि लाफ्टर थेरेपीस्ट कमलेश मसालावाला यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.

अहमदाबाद - गुजरातच्या सुरतमधील एका लाफ्टर क्लब चालकाच्या संकल्पनेतून 10 हजार शालेय विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनोखी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या शपथेचे सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ येथील विविध शाळेतील 10 हजार विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधत ही शपथ घेण्यात आली आहे. 

सुरतमधील लाफ्टर क्लब आणि क्राईंग क्लबचे संस्थापक आणि लाफ्टर थेरेपीस्ट कमलेश मसालावाला यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यानंतर, या संकल्पनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल 10 हजार शालेय विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली. सुरतमध्ये मसालावाला यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मी प्रेम किंवा प्रेमविवाहाच्या विरोधात नाही. मात्र, प्रत्येकाच्या जीवनातील त्यांच्या आई-वडिलांचे योगदान कुणीही विसरता कामा नये. आई-वडिलांनीही मुलांच्या भविष्याबाबत अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. त्यामुळे मुलांनी आपल्या अपेक्षेने लग्न करावे, ही त्यांची इच्छा असते. 

माझ्याकडे अनेक मुले त्यांच्या लग्नासंदर्भातील समस्या घेऊन येतात. कारण, त्यांच्या प्रेमाला, प्रेमविवाहाला कुटुंबातून विरोध असतो. मात्र, कुटुंबीयांना समजावून सांगितल्यास, त्यांचा विरोध कमी होऊन ते तुमच्या लग्नला परवानगी देतील, असे मला वाटते. माझ्याकडे येणाऱ्या मुलांच्या या समस्यांमधूनच मला ही संकल्पना सुचल्याचे मसालावाला यांनी सांगितले. त्यानंतर, मी हरातील शिक्षण संस्थाचालकांशी संपर्क केला असून, त्यापैकी जवळपास 20 शाळांनी आमच्या या संकल्पनेत सहभाग होण्यास प्रतिसाद दिला. त्यानुसार, आम्ही या शपथ कार्यक्रमाची तयारी केली.   दरम्यान, शहरातील बाल मनोरोगतज्ञ डॉ. मुकूल चोक्सी यांनी लिहिलेल्या कवितेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. मुकूल चोक्सी हे स्वत: कवी आहेत.    

टॅग्स :GujaratगुजरातValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSuratसूरतmarriageलग्न