महावितरणच्या लाईनस्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लवकरच
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:37+5:302015-08-03T22:26:37+5:30
महावितरणच्या लाईनस्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लवकरच

महावितरणच्या लाईनस्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लवकरच
म ावितरणच्या लाईनस्टाफसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लवकरचमुंबई : महावितरणमधील ५० पेक्षा जास्त वय असणार्या श्रमजीवी जनमित्रांना दैनंदिन कामकाज करताना वयोमानानुसार अडचण येत असल्याच्या कारणात्सव केवळ लाईनस्टाफसाठी पुन्हा स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेसोबत झालेल्या बैठकीत कार्यकारी संचालक निलेश गटणे यांनी यासंबधीची घोषणा केली आहे. वयोमानामुळे जनमित्रांना पोलवर चढणे, पेट्रोलिंक करत फॉल्ट काढणे आदी कामे करताना होणारा त्रास लक्षात घेता यासंबधीची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीदरम्यान, शासन निर्णयाप्रमाणे मासिक वाहन भत्ता ७५० रुपयांऐवजी १ हजार रुपये देण्याचे परिपत्रक काढण्यात येईल. सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी वर्गाची थकीत प्रकरणे निकाली काढण्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल. नव्याने नियुक्त झालेल्या तांत्रिक कामगारांना अतिरिक्त दोन वार्षिक वाढ देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येईल. अंतर्गत भरतीमध्ये कंपनीतील पदवी आणि पदविका धारक कामगारांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात याव्यात म्हणून टिप्पणी सादर करण्यात येईल. शिवाय पदोन्नतीनंतरची दरी कमी करणे; आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी सांगितले.दरम्यान, महानिर्मितीमधील तंत्रज्ञांच्या सरळ भरती परिक्षेनंतर पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी संचालक मनोज रानडे यांनी दिले. तर महापारेषणमधील अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरतीची जाहिरातही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी संचालक सुरज वाघमारे यांनी बैठकीत दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)........................