आवाज ए पंजाब, नवज्योत सिंग सिद्धूचा नवा राजकीय पक्ष

By Admin | Updated: September 2, 2016 16:29 IST2016-09-02T16:29:58+5:302016-09-02T16:29:58+5:30

भाजपाला रामराम ठोकलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने आम आदमी पार्टीमध्ये न जाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

Voice A Punjab, Navjot Singh Sidhu's new political party | आवाज ए पंजाब, नवज्योत सिंग सिद्धूचा नवा राजकीय पक्ष

आवाज ए पंजाब, नवज्योत सिंग सिद्धूचा नवा राजकीय पक्ष

>ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 2 - भाजपाला रामराम ठोकलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने आम आदमी पार्टीमध्ये न जाता नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आवाज ए पंजाब असं या पक्षाचं नाव असून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आवाज ए पंजाब उतरणार आहे.
आम आदमी पक्षाने नवज्योत सिंग सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावे अशी सिद्धूची अट असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल एकवाक्यता न झाल्यामुळे त्याने नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
जुलैमध्ये सिद्धूने भाजपाला राम राम ठोकला होता. पंजाब हेच माझं कार्यक्षेत्र असून पंजाबपासून लांब राहण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळेच भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे सिद्धूने स्पष्ट केले होते. नवीन पक्षाची अधिकृत स्थापना 9 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

Web Title: Voice A Punjab, Navjot Singh Sidhu's new political party