शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनतेचा आवाज; ज्येष्ठ नेते लोकांशी संपर्क करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:43 IST

पक्षाने दिले ‘जन आवाज’ नाव; १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे नेते नागपूरमध्ये

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा देशातील जनतेच्या ‘मन की बात’वर तयार होईल व पक्षाने त्याला ‘जन आवाज’ असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत पक्षाचे नेते देशभर लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेतील, काँग्रेसकडून त्यांना काय अपेक्षा आहेत व २०१९ मध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर त्यांना कशा प्रकारचे सरकार हवे आहे म्हणजेच त्यांची प्राथमिकता काय असेल, कोणत्या प्रकारच्या योजना तयार केल्या जाव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या विचारांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी पक्षाचे २२ वरिष्ठ नेते वेगवेगळ्या शहरांत जाऊन लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. मुंबई, चंदीगढसह अनेक शहरांत याची सुरवातही झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये हे नेते असतील. एक आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेने काँग्रेसला व्यापक यश मिळाले आहे व त्यामुळे ही मोहीम अधिक वेगवान बनवण्यात आली आहे व डिसेंबरअखेर ती पूर्ण करण्याचा पक्षाचा विचार आहे. दरम्यान, देशातील लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर ज्या सूचना आणि सल्ला मिळेल त्याला निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाईल.थेट संवादाच्या या प्रक्रि येला पक्षाने दोन भागांत विभागले आहे. एक बंद खोलीतील संवाद आणि खुली चर्चा. जे लोक थेट संवादात सहभागी होऊ शकणार नाहीत ते व्हॉट्सअ‍ॅप किंवा ईमेलद्वारे पक्ष नेतृत्वाला आपल्या सूचना कळवतील. पक्षाचे नेते पी. चिदम्बरम आणि राजीव गौडा यांनी या उद्देशाने संकेतस्थळही (वेबसाईट) सुरू केले आहे व लोकांना आवाहन केले की ७२९२०८८२४५ या क्रमांकावर आपल्या सूचना व्हॉट्सअ‍ॅप कराव्या.इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाचपक्षाचे जे २२ नेते वेगवेगळे गट बनवून एकूण १३०-१४० शहरांत ज्या काही सूचना एकत्र करतील त्या येत्या जानेवारी महिन्यात पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट होतील.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने थेट लोकांशी जोडले जाता येईल असा हा काँग्रेसच्या इतिहासात असा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९