व्होडाफोनची 4 जी ग्राहकांना बंपर ऑफर

By Admin | Updated: January 18, 2017 17:26 IST2017-01-18T17:11:47+5:302017-01-18T17:26:18+5:30

देशातील टेलिकॉम क्षेत्रात दुस-या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने प्रीपेड 4 जी युजर्संना चौपट फायदा होऊल असा डेटा प्लॅन सुरु केला आहे.

Vodafone offers 4G customers a bumper offer | व्होडाफोनची 4 जी ग्राहकांना बंपर ऑफर

व्होडाफोनची 4 जी ग्राहकांना बंपर ऑफर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - देशातील टेलिकॉम क्षेत्रात दुस-या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने प्रीपेड 4 जी युजर्संना चौपट फायदा होऊल असा डेटा प्लॅन सुरु केला आहे. 
व्होडाफोन कंपनीकडून सध्या 250 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी 4 जी डेटा मिळतो. आता याच किमतीत 28 दिवसांसाठी 4 जीबी डेटा मिळणार आहे. तर, 999 रुपयांत 22 जीबी डेटा मिळेल. ज्या सर्कलमध्ये कंपनीची 4 जी सेवा आहे, तेथे हा प्लॅन सुरू करण्यात आला आहे. महिन्याला 1500 रुपयांच्या प्लॅनवर 35 जीबी सुद्धा कंपनीने ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. 
दरम्यान, सध्या टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रतिस्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यापासून रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना 4 जी डेटा मोफत दिला आहे. त्यामुळे आता व्होडाफोन कंपनीने सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा प्लॅन आणला आहे. तसेच, याआधीही एअरटेल कंपनीने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी ऑफर आणली होती.   
व्होडाफोनचे आत्तापर्यंतचे भारतात 200 दशलक्ष ग्राहक झाले आहेत. 

Web Title: Vodafone offers 4G customers a bumper offer