शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 12:42 IST

विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली. 

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वेअपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर 54 हून अधिक जण जखमी झाले आहेत. विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने त्यावेळची अंगावर काटा आणणारी घटना सांगितली आहे. 

न्यूज एजन्सीनुसार, ओडिशातील रहिवासी दिलीप कुमार पात्रो नावाच्या प्रवाशाने सांगितले की, तो त्याची पत्नी, 6 वर्षांची मुलगी आणि इतर तीन जण ट्रेनने घरी परतत होते. रविवारी सायंकाळी सात वाजता त्यांना झटका बसला. त्यानंतर काही सेकंदातच जोरदार धक्का बसला आणि संपूर्ण ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. सर्वजण 'वाचवा-वाचवा' म्हणून ओरडू लागले. हा अपघात झाला तेव्हा त्यांची सहा वर्षांची मुलगी वरच्या बर्थवर होती. 

मुलगी खाली पडली. पण सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. हे सर्व नेमकं कसं घडलं हे माहीत नाही. ट्रेन रुळावरून घसरून दुसऱ्या ट्रेनला धडकली एवढेच माहिती मिळाली. पात्रो यांनी सांगितलं की, अपघातानंतर लगेचच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. सगळे बाहेर पळू लागले. आमच्या जवळच डब्याखाली एक मृतदेह पडलेला मला दिसला. हे बघून माझी प्रकृती बिघडली. पण कसा तरी मी कुटुंबासह कोचमधून बाहेर आलो. 

माझी मुलगी रडत होती. बायको घाबरली. असा अपघात मी आयुष्यात विसरू शकणार नाही. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 54 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यावर आम्हाला खूप वाईट वाटलं. किती कुटुंबे उद्ध्वस्त झाली कुणास ठाऊक. आम्ही फक्त देवाचे आभार मानत होतो की आमचं कुटुंब वाचलं. हा अपघात मी कधीही विसरू शकणार नाही. लोकांच्या किंकाळ्या आणि चेंगराचेंगरी आठवून भीती वाटते.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आंध्र प्रदेशातील मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आणि अन्य राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात