विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 08:56 IST2025-05-03T08:55:00+5:302025-05-03T08:56:41+5:30
मोदी यांच्या भाषणाचे भाषांतर करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या उद्गारांचा अचूक अर्थ लोकांपर्यंत पोहोचविला नाही. त्याबाबत मोदी म्हणाले की, मला जो संदेश लोकांना द्यायचा होता, तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
थिरूवअनंतपुरम : विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केले. ८,८६७ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या बंदरामुळे केरळ आणि देशाची आणखी आर्थिक प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना उद्देशून मोदी म्हणाले की, विझिनजम बंदराचा उद्घाटन सोहळा अनेकांची रात्रीची झोप उडविणार आहे.
मोदी यांच्या भाषणाचे भाषांतर करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या उद्गारांचा अचूक अर्थ लोकांपर्यंत पोहोचविला नाही. त्याबाबत मोदी म्हणाले की, मला जो संदेश लोकांना द्यायचा होता, तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
देशाच्या विकासाचा आढावा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रवासी जलवाहतुकीच्या बाबतीत भारत आता जगातील तीन अग्रगण्य देशांपैकी एक आहे. गेल्या १० वर्षांत
भारतीय बंदरांची क्षमता दुपटीने वाढली, त्यांची कार्यक्षमता सुधारली आणि ‘टर्नअराउंड टाइम’ म्हणजेच जहाज पोहोचल्यापासून ते निघेपर्यंतचा कालावधी ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. (वृत्तसंस्था)
योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व आंध्रात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर केले की, येत्या २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ते आंध्र प्रदेशात करणार आहेत. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या आमंत्रणावर त्यांनी ही घोषणा केली.